हिमायतनगर प्रतिनिधी/ भोकर हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील वायवाडी,दाबदरी फाटा येथे ३० आक्टोबर रोजी सकाळी ८.३० वा अखंड गोर, बंजारा समाजाचे दैवत, धर्मगुरू,बालब्रम्हचारी संत रामराव महाराज यांची पुण्यतिथी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या ऊपस्थीत साजरी करण्यात आली.सुरूवातीला आ.जवळगावकर यांच्या हस्ते बापुच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन ताडेवाड,शेख रफिकभाई, कैलास पाटील माने, बालाजी राठोड, मुकुंद राठोड, शंकर नाईक,धर्मा राठोड,माजी उपसभापती परसराम पवार, गुलाब राठोड, नारायण जाधव, शामराव जाधव, अर्जुन राठोड, गणेश राठोड, बाबुराव नाईक,प्रेमसिग जाधव,राम जाधव,आडे यांच्यासह अनेक बंजारा बांधवांनी उपस्थिती होती.
वायवाडी फाटा येथे संत रामराव महाराज यांची पुण्यतिथी आ.जवळगावकर यांच्या उपस्थितीत साजरी
0
October 30, 2022
