हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील खैरगाव या गावी किरकोळ सह ठोक देशी दारू विक्री केंद्र बनले आहे. दारुबंदी अधिकारी देखील या अड्याकडे डोळे असुन आधळ्याची भुमिका घेत आहेत.तर या विभागाचे पोलीस जमादार मायेपोटी दिवसा ढवळ्या आणि सकाळ पासून रात्री केव्हाही वेळेचे बंधन नसलेल्या ठिकाणी बिनदिक्कतपणे देशी दारू ची विक्री होत आहे. पोलिस निरीक्षक बिरप्पा भुसनुर यांनी महिलांच्या मांडणीची गंभीरपणे दखल घेऊन येथील ठोक विक्रेत्यांचा अडा बंद करून महिलांना दिलासा द्यावा अन्यथा पोलिस स्टेशन वर महिलांचा मोर्चा अटळ असल्याचे सरपंच अॅड बाळा पतगे यांनी देशोन्नती शी बोलताना सांगितले... खैरगाव येथुन च खैरगाव,वटफळी कामारवाडी, कांडली ,पारवा येथे अनधिकृत देशी दारू चा पुरवठा होत आहे.वेळेचे बंधन नसलेल्या या अवैध देशी दारू मुळें गोरगरीबांच्या संसार संसारात मोठ्या प्रमाणात महिलांना, लहान लहान मुलांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.या विभागाचे पोलीस जमादार यांना या बाबींची ईत्यभुत माहिती असुन ही त्यांनी माये पोटी कमालीचे दुर्लक्ष केल्याने अवैध देशी विदेशी दारू विक्री करणारे दिवसेंदिवस निर्ढावत आहेत.गावागावात दुर्गा उत्सव, धम्मचक्र चालू असुन अशा अवस्थेत अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस स्टेशन ला बसवा अशी सुचना कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अर्चनाताई पाटील यांनी शेकडो जणांच्या समोर दिली असतानाही त्याकडे हिमायतनगर पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी करतो मारल्या सारखे तुम्ही करा रडल्या सारखे असेच तर होत नसेल ना अशा ऊलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.. पोलिस बांधवांनी वेळीच दखल घेऊन खैरगाव येथील अनधिकृत होलसेल देशी दारू विक्री बंद करावी अन्यथा महिलांचा या मागणीसाठी मोर्चा अटळ असल्याचे सरपंच अॅड बाळा पतंगे यांनी दिला आहे.
खैरगाव (ता.) येथील अवैध दारू विक्री संदर्भात लवकरच महिला ग्रामसभा घेऊन पोलिस स्टेशन वर मोर्चा काढण्यात येईल....
ॲड.बाळा पतंगे खैरगावकर
सरपंच, खैरगाव
