हिमायतनगर तालुक्यातील वाडी तांड्यावरील जि. प.शाळा बंद करण्याचा आदेश रद्द करा- गोर सेना संघटनेची मागणी


हिमायतनगर प्रतिनिधी/ राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या 0 ते 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे वाडी-तांड्यावरील गोरगरीब पालकांची चिंता वाढली असून हिमायतनगर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावरील शाळा बंद करण्याचा झालेला निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी गोर सेना संघटनेच्या वतीने तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

      हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी अबादी वडगाव ज, वडगाव तांडा, पावनमारी, लाईन तांडा, बळीराम तांडा , हदगाव रोड, नवी आबादी करंजी, कोतलवाडी तांडा, किरमगाव, वडाचीवाडी , धनव्याची वाडी,  उखळवाडी, वडाची वाडी, गणेशवाडी तांडा,  गणेशवाडी, जीरोना,  बोरगडी तांडा एक, आंदेगाव या गावातील तालुक्यातील वाडी तांड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असुन ह्या निर्णयामुळे वाडी तांड्यावरील गोरगरिब पालकांना आपल्या मुला बाळाच्या शिक्षणाची चिंता वाढली असुन गावातील शाळा बंद होत असेल तर गोरगरीबांची मुले शहराच्या ठिकाणी शाळेत कशी  पाठवायची असा प्रश्न या गावातील पालकांना पडला आहे. 
सदरील प्रस्तावित निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने तात्काळ थांबवला नाही तर गोर सेना संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन करण्याचा इशारा गोर सेना अध्यक्ष आकाश जाधव, प्रमोद राठोड, जगदीश जाधव, विजय राठोड, विलास आडे, अविनाश जाधव, अजित आडे, अंकूश जाधव यांनी तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.