हिमायतनगर प्रतिनिधी/ शिवसेना संपविण्यासाठी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी बैमानी अशा गद्दारांमुळे शिवसेना संपणारी नाही माझा जन्म शिवसेनेत झाला पुन्हा तिच शिवसेना या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काळात दिसणार असल्याचे शिवसेना नेते माजी खा. सुभाष वानखेडे यांनी सांगितले.
हिमायतनगर येथे रविवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी खा. सुभाष वानखेडे यांनी पक्षप्रवेश घेतल्यानंतर प्रथमच हिमायतनगर तालुक्यात आगमन झाले होते. या बैठकीस शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी खा.वानखेडे म्हणाले की माझा जन्म शिवसेनेत झाला मी शिवसेनेत असतांना पदावर राहून पक्षाशी गद्दारी केली नव्हती आज जे पक्षाशी गद्दारी करुन पक्ष विरोधी काम करीत आहेत त्या गद्दारांना येणाऱ्या काळात शिवसैनिक धडा शिकवतील हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांनी एकजुटीने राहून पुन्हा शिवसेनेचे काम करायचे आहे. येणाऱ्या निवडणूक काळात पक्षाची जबाबदारी सांभाळून निष्ठेने काम करू असेही बोलतांना वानखेडे म्हणाले .
यावेळी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. माजी खा. सुभाष वानखेडे यांनी तालुक्यातील कारला, वडगाव, पवना, पळसपुर गावांना भेटी देऊन जुन्या शिवसैनिकांशी संवाद साधला अनेक ठिकाणी वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
