हिमायतनगर प्रतिनिधी( दत्ता पुपलवाड) तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी पुत्र शिवाजी हाके यांनी नेट परिक्षेत यश संपादन केले असल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद शाळेत सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.
वारंगटाकळी येथील शेतकरी साहेबराव हाके यांचा मुलगा शिवाजी हाके यांनी नांदेड येथे नेट चे शिक्षण घेतले आहे. वडील शेतकरी असल्यामुळे क्लासेस लावण्यासाठी ची परिस्थिती नव्हती तरी देखील शिवाजी हाके यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले आणि नेट परिक्षेत सातशे पैकी पाचशे 44 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले.
त्यांच्या यशाबद्दल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ग्रामस्थांकडून जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक मुंडे,सरपंच मायाबाई गिरी, पोलीस पाटील आवदुत कदम,दयाळगिर गिरी,आबाराव पाटील,प्रकाश हाके, संचालक दत्ता पुपलवाड, विश्वाभंर राणे, शिवाजी कदम, विश्वाभंर कानोटे, बालाजी देवकते, चिखले, शिक्षिका सलगिरे, बड्डेवाड, यांच्यासह ग्रामस्थांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
