हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील कोहळीकर गट शिंदे गटात जाणार- कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बाबुराव कदम यांचाही निर्णय

हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार)  हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे नेते शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता जनसंवाद मेळाव्यात कोहळीकर समर्थकांनी बाबुराव कदम कोहळीकर यांनी लवकर शिंदे गटात सामील होण्याची मागणी अनेक समर्थकांनी व्यासपीठावरून केली .कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन बाबुराव कदम कोहळीकर लवकरच शिंदे गटात हजारो समर्थकांना घेऊन जाणार असल्याचा निर्णय परिसंवाद सोहळ्यात झाला आहे. 
हदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या तिस वर्षापासून शिवसेनेचे नेतृत्व बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे. जिल्हा परिषद सदस्य ते शिवसेना जिल्हा प्रमुख असा प्रवास कोहळीकर यांचा होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाबुराव कदम कोहळीकर यांना पक्षश्रेष्टीने उमेदवारी दिली नसल्याने कोहळीकर यांनी बंड पुकारून विधानसभा निवडणुक अपक्ष लढविली होती. 
या निवडणुकीत कोहळीकर यांना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील मतदारांनी दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले होते. 
बाबुराव कदम कोहळीकर यांना पक्षाची उमेदवारी नाकारून निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केल्यामुळे मतदारांनी सहानभूती दाखवत अपक्ष उमेदवार असणाऱ्या कोहळीकरांनी विधानसभा निवडणुकीत मातब्बरांना धक्का बसेल असे मताधिक्य मिळवून दिले होते. अल्पशा मतांनी पराभूत होऊन देखील कोहळीकर यांनी गेल्या अडिच वर्षापासून जनसंपर्क सुरुच ठेवला आहे.

 दि. 1 आगस्ट रोजी निवघा येथे कार्यकर्ता परिसंवाद सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेकडो कोहळीकर समर्थकांनी गर्दी केली होती. व्यासपीठावरून अनेकांनी भाषणे झाली प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितले की बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होऊन आगामी निवडणुका लढवाव्यात अशी आग्रही भूमिका मांडली. आणि उपस्थित सर्वांनी शिंदे गटात जाण्यासाठी समर्थन दर्शविले बाबुराव कदम कोहळीकर यांनी देखील आपण लवकरच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हजारो कार्यकर्ते घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याचे सांगितले. यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील कोहळीकर गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात लवकरच जाणार
     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच मी शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी मला लवकर निर्णय घ्या असे सांगितले परंतु माझ्या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते यांचा विचार घेतल्या शिवाय निर्णय घेतला नाही. मला फक्त मतदारसंघातील जनतेची जिवात जिव असेपर्यंत सेवा करायची आहे. गेल्या निवडणुकीत दिलेले आशिर्वाद जिवनभर विसरणार नाही असे भावनिकता कोहळीकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे कार्यकर्ता परिसंवाद आयोजित करून प्रत्येकाचे मनोगत ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हदगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकांची परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री यांना घेऊन येणार आहे. व तदनंतर हजारो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.