माणूस" हा आप्णा भाऊच्या साहित्याचा केंद्र बिंदू - गंगाधर वाघमारे

हिमायतनगर प्रतिनिधी/आणा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे तत्कालीन काळातील वास्तव जीवन शैली असून त्यांच्या साहित्यात माणूस हा केंद्र बिंदू मानुन त्यांनी एकंदरीत साहित्याची निर्मीती केली असून त्यांच्या साहित्याला बंड, क्रांती, आणि विद्रोहाच्या वास्तवतेची झालर आहे. आसे प्रतिपादन गंगाधर वाघमारे यांनी आष्टी येथील आण्णाभाऊ साठे जयंती निमीत आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप भाषण प्रसंगी बोलताना केले .
         कायक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश पाटील आष्टीकर, संजय कांबळे, सरपंच सौ. सुषमाताई जाधव, शोभाबाई कांबळे, रामेश्वर महाराज, मनोज जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष चंपतराव पाटील, साहेबराव पाटील, नितीन डोंगरे,. चांदराव कांबळे, ग्राम विकास अधिकारी चव्हाण यांची उपस्थिती होती . पुढे बोलताना गंगाधर वाघमारे म्हणाले की, माणसाचे माणूसपण जपणारा हा साहित्यीक सतत चळवळीत जगला . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी साठी माणसे जोडली व पोवाड्याच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्राची ही ठाम भुमीका घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यानी स्वतः ला झोकून दिले. त्यांचे साहित्य वैचारिक असून त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची धार आहे. समाज व्यवस्थेतील लहाना पासून मोठ्या पर्यन्तच्या माणसाच्या जगण्याची, बोलण्याची, वागण्याची व राहाणीमानाची ढब आण्णा भाऊनी त्यांच्या स्वहित्यात जाणिव पूर्वक वाचका समोर मांडणी केली . त्यांच्या साहित्याला धार असल्याले त्यांच्या साहित्याचा वाचक वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. आसे ही त्यांनी या वेळी सांगितले . कार्यक्रमाच्या प्रारंभी छतपती शिवाजी महाराज, लहुजी साळवे, म. फूले, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हास्ते पुजन करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रल्हाद जाधव यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.