उत्कृष्ट शैक्षणिक आलेख असलेला व्यक्ती प्राचार्य म्हणून लाभल्याचे समाधान - प्रफुल्लजी राठोड

किनवट/प्रतिनिधी - गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात आमच्या महाविद्यालयास प्राध्यापक डॉ. नल्ला जगनमोहन रेड्डी यांच्या रूपाने विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य असलेला प्राचार्य मिळाल्याचे समाधान आहे" असे गौरवोद्गार बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी व्यक्त केले. दि. ३१ जुलै रोजी बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नल्ला जगनमोहन रेड्डी यांच्या सेवानिवृत्तीनिमीत्त आयोजित सत्कार समारंभात अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलत होते.
    डॉ. रेड्डी श्री रेणुकादेवी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रूजू होण्यापूर्वी कंधार येथील श्री शिवाजी महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचे सहायक प्राध्यापक ते अभ्यासक म्हणून ३० वर्ष सेवा दिलेली आहे. देश विदेश स्तरावरील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात जवळपास ४० लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ०५ विद्यार्थ्यांना पी.एच डी तर ०३ विद्यार्थ्यांनी एम फिल ची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन झाले आहे, अशा प्राचार्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सपत्नीक आहेर, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच उपस्थितांनीही आपल्या भावना शाल , श्रीफळ, बुके, हार, व भेटवस्तूंच्या माध्यमातून व्यक्त केल्या. 
     यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव सौ. संध्याताई राठोड, संस्थेचे स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुलेमानजी फारूखी, रऊफभाई सौदागरजी, सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, शिवाजी महाविद्यालय कंधार चे प्राचार्य डॉ. गिरमाजी पगडे, डॉ. अब्दुल कासार , डॉ. दिलीप सावंत, इ. मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
    व्यासपीठासमोर डॉ. पांडुरंग पांचाळ, बळीराम पाटील महाविद्यालय किनवटचे डॉ. राजकुमार नेमानीवार , डॉ. जी.बी.लांब, डॉ. एस.आर. शिंदे डॉ. विजय उपलेंचवार, डॉ. आर.एम. कदम, प्रा. रिजवान पठाण, प्रा. अब्रार खान, डॉ. बाबुराव कमले, ग्रामीण रुग्णालय माहूर येथील श्री शिवाजी साळुंखे, श्री रविकांत सालमे यांच्या सारख्या शिक्षण व आरोग्य विभागातील प्रतिष्ठितांची उपस्थिती लक्षवेधक ठरली. तर डॉ. रेड्डी यांच्या जवळपास तीस नातेवाईकांची उपस्थिती त्यांच्या सोज्वळ , प्रेमळ स्वभावाची साक्ष देऊन गेली. 
   महाविद्यालयाच्या वतीने डॉ. दत्ता जाधव यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले, संशोधक विद्यार्थ्यांतर्फे अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर.एम.कदम यांनी तर नातेवाईकांतर्फे डॉ. रमण्णा रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले.
    सत्कार समारंभात बोलताना सत्कारमूर्ती डॉ. रेड्डी यांनी प्राचार्य पदी कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांना धन्यवाद दिले. तसेच पूर्वाश्रमीच्या श्री शिवाजी मोफत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. भाई केशवरावजी धोंडगे यांच्या प्रेम व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लोणे यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. तुळशीदास गुरनुले यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.