हिमायतनगर प्रतिनिधी( सोपान बोंपीलवार) मंगरूळ पुलावरून मोठ्या प्रमाणात पुर वाहत असल्यामुळे तिन दिवसापासून नागरीकांचा संपर्क तुटला आहे. गावाबाहेर निघता ऐत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर नदीच्या थडीला गाया चरत असतांना पाण्यात आलेल्या पुरात गाय वाहुन मृत्यू झाल्याची घटना घडली तर चार पाच घरांची पडझड झाली आहे यामुळे कुटुंबिय उघड्यावर आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील पुल गेल्या काही दिवसापासून खचला असुन या पुलामुळे पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे. आठ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
मंगरूळ पुलावरून मोठ्या प्रमाणात पुर वाहत असल्यामुळे नागरीकांना गावाबाहेर निघता जमेना झाले आहे.
बुधवारी दुपारी नदी च्या थडीला शेतकरी सुभाष जललवाड हे गाय चारत होते. अचानक पुर वाढला आणि सदरील गाय पुरात वाहुन गेल्याची घटना घडली काही तासानंतर गाय मृत्यू झाल्याच्या अवस्थेत आढळून आली आहे . यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर गावातील चार पाच नागरीकांचे या पावसामुळे पडली असुन सदरील घरात राहणारे कुटुंब उघड्यावर आले आहेत.त्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी सरपंच प्रतिनिधी जिवन जैस्वाल यांनी केली आहे. मंगरूळ येथील पुलाची उंची वाढवून पुल बांधकाम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
