हिमायतनगर प्रतिनिधी ( कैलास कदम) तालुक्यातील टेंभुर्णी- वाघी शिवारात अतिवृष्टीमुळे कॅनाल भरून वाहत असुन सदरील कॅनाल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरला असुन संपुर्ण पीके पाण्याखाली गेली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील आठ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुहेरी अतिवृष्टी झाली असुन या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
पेरण्या केल्यानंतर पिकांची वाढ होत असतांनाच पावसाने हजेरी लावल्याने पिके उभे राहण्या अगोदरच अतिवृष्टीमुळे खचून गेली आहेत.तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असुन जमीन पाण्याखाली गेल्या असल्याने पिक दिसेनासे झाली आहेत.
टेंभुर्णी येथील शेतकरी विलास भाऊराव पाटील, वाघी येथील शेतकरी शिवाजी दत्तराव देवसरकर या शेतकऱ्यांच्या शिवारातुन वाहणारे कॅनाल अनेक ठिकाणी मुसळधार पाण्याच्या वेगाने फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कॅनाल फुटल्याने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी टेंभुर्णी येथील सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी केली आहे.
