हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात सर्वात जाास्त अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या असुन सध्या तरी शेतकऱ्यांचे पिके हाती लागण्याची शक्यता नसल्याने शेतकरी हताश झाला असुन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी कांग्रेस पक्षाचे योगेश चिलकावार यांनी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचा फटका बसत आहे.
यावर्षी शेतकऱ्यांच्या पेरण्या होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जुन पासुन ते जुलै अखेर पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बियाणे उगवले होते तेही खरडून गेले त्यामुळे शासनाने हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजाराची मदत देण्याची मागणी कांग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू योगेश चिलकावार यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
हिमायतनगर शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे.व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असुन तलाठी मंडळ अधिकारी यांनी देखील शंभर टक्के नुकसान दाखवून प्रशासनाकडे अहवाल देऊन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी योगेश चिलकावार यांनी केली आहे
