हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील पतंगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात पैनगंगा नदी काठासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिके राहिली नाहीत दुबार पेरणी करून देखील शेतकऱ्यांची पिके उगवली नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे नदी नाल्याच्या पावसामुळे शेतातील खरडून गेली आहेत. शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी यांनी शंभर टक्के नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील पतंगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
