माजी खा. सुभाष वानखेडे यांचा शिवसेना प्रवेश हदगाव हिमायतनगर मतदारसंघात जल्लोषात स्वागत

हिमायतनगर प्रतिनिधी/  माजी खा सुभाष वानखेडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेश घेतला असुन वानखेडे यांच्या शिवसेना प्रवेशाचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले असून वानखेडे यांच्यामुळे शिवसैनिकांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. 
      हदगाव विधानसभा मतदारसंघात एक कणखर नेता म्हणून सुभाषराव वानखेडे यांच्या कडे पाहिले जाते. या मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी तिन वेळा काम केले आहे. तर खासदार म्हणून एक वेळा लोकसभेचे काम केले. मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुभाष वानखेडे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.सोबत माजी आ.नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. हदगाव येथे गुरुवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुभाष वानखेडे यांचे जल्लोषात स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  लवकरच मतदारसंघात दौरा करून शिवसैनिकांच्या भेटी घेणार असल्याचे माजी खा सुभाष वानखेडे यांनी सांगितले आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.