नांदेड - जिल्ह्यात सातत्याने छायाचित्रकारणा चोरट्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. फाईन आर्ट स्टुडिओ मध्ये दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात कॅमेरा आणि इतर साहित्याची पूजा करून दुकान बंद केल्यानंतर रात्री चोरट्यानी पूजेतील सर्व कॅमेरे व साहित्य असा जवळपास 4 लाखाच्या सामानाची चोरी केली आहे. त्यानंतर 31 मार्च 2022 रोजी शिवाजीनगरच्या मुख्य रस्त्यावर फोटोग्राफीचे काम संपवून रात्री उशिरा येणाऱ्या संजय कुलकर्णी छायाचित्रकाराला शस्त्राचा धाक दाखवून कॅमेरा, मोबाईल गळ्यातील सोन्याची चैन आणि असलेली सर्व रक्कम लुटण्याची अत्यंत दुर्दैवी घटनाही घडली आहे. रात्री बेरात्री अशा लुरण्याच्या घटना यापूर्वीही घडक्या आहेत. त्याबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत मात्र अजून पर्यंत तरी कुणाला अटक करण्यात आलेली नाही. सततच्या घडणाऱ्या या चोरी आणि लुटीच्या घटनांमुळे छायाचित्रकारामध्ये दहशत आणि भीतीचे वातावरण आहे. कुठलेही मोठे भांडवल नसलेले आणि कॅमेरा हेच सर्वस्व असणाऱ्या छायाचित्रकारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती छायाचित्रकारांनी पोलीस अधीक्षकाना केली आहे. हातावर पोट असणारे आणि आपल्या कलेच्या बळावर उपजीविका करणाऱ्या छाया चित्रकारांना न्याय मिळवून द्यावा यासाठी नांदेड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष महेश होकर्णे, छायाचित्रकार संजय पाठक, राहुल देशमुख ,संजय कुलकर्णी,दत्तराज फटाले,अविनाश हंबर्डे,गणेश ठाकूर, रुपेह संबनवार, विजय शेटे,प्रमोदसिह ठाकूर, प्रशांत चलिंद्रवार, पिराजी गाडे,नरशिंग बोगा, विनोद सोनटक्के ,प्रकाश सूर्यवंशी,विनोद डोईजड, प्रकाश परभंनकर, प्रकाश पराडकर, नीलकंठ नामदे, प्रवण पांडे, संजय जोंधळे, श्रीकांत शिंदे, भागवत भातलवांडे ,शुभम होळकर,अवधूत गिरी, लक्षीमन देवडेर , राजू घ घोरंभांड , सलीम शेख ,वेकटेश वाकोडीकर,इत्यादींच्या सह्या असणारे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
