पैनगंगा कोरडीठाक पडल्याने शेतकऱ्यांनी केली जनावरासाठी पाण्याची व्यवस्था- पळसपुर येथील शेतकऱ्यांचा स्तुत्य उपक्रम

हिमायतनगर प्रतिनिधी ( सोपान बोंपीलवार)  पैनगंगा नदी पात्र कोरडेठाक पडल्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांसह जनावरांना चाऱ्यासह पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पळसपुर येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उन्हाळी पिक काडून टाकून जाणावरासह वन्य प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करून एक स्तुत्य उपक्रम केला आहे. या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केल्यामुळे उन्हाने व्याकूळ झालेली जनावरांना पाणी मिळत असल्याने या बद्दल शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे. 
       हिमायतनगर विदर्भ सीमेवर पैनगंगा नदी वाहते या पैनगंगा नदीचे पात्र फेब्रुवारी पुर्वी कोरडेठाक पडल्यामुळे या भागातील अनेक गावच्या नळ योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पळसपुर येथील शेतकरी दिगाबंर उत्तम देवसरकर यांच्या शेतातील बोअरवेल ला पाणी असल्याने दरवर्षी उन्हाळी पिक घेत असतात. परंतु यावर्षी पैनगंगा नदी पात्र लवकरच कोरडेठाक पडले सध्या मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 
या भागातील जनावरे पाण्यासाठी रानोमाळ फिरकत आहेत. परंतु पाणीच नसल्यामुळे जनावरे अस्वस्थ होत असल्याचे शेतकरी दिगाबंर देवसरकर यांच्या लक्षात आले. सदरील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उन्हाळी पिक काढून टाकले आणि हौदामध्ये दररोज तिन वेळा जनावरांना पाणी मिळावे याची व्यवस्था केली. पळसपुर येथील शेतकरी दिगाबंर देवसरकर यांच्या या उपक्रमामुळे जनावरासह वन्य प्राणी देखील पाणी पिण्यासाठी येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सध्या उन्हाची तिव्रता वाढत असून या उन्हामुळे पैनगंगा नदी काठच्या जंगली भागातील वन्य प्राणी पाण्यासाठी धाव घेत असुन वन्य प्राण्यांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देवसरकर यांच्या मुळे सुटला असुन शेतकऱ्यांच्या उपक्रमाचे सरपंच मारोती वाडेकर, उपसरपंच गजानन देवसरकर , माजी सभापती वामनराव पाटील वानखेडे, सुनील पाटील पतंगे, दिगाबंर पाटील वानखेडे, तुकाराम कोमलवार,दाऊ गाडगेवाड यांच्या सह पळसपुर ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. 








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.