हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक हि शेतकऱ्यांची कामधेनु बॅंक असुन शेतकऱ्यांनी या बॅंकेसोबत व्यवहार करण्यासाठी घाबरण्याचे कारण नाही त्यामुळे आपले अनुदान किंवा इतर व्यवहार देखील शेतकऱ्यांनी बँकेसोबत ठेवले पाहिजे तेंव्हा शेतकऱ्यांची बॅंक लवकच मोठी होणार असे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी उध्वजी बसवंते यांनी व्यक्त केले आहे.
हिमायतनगर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तपासणी अधिकारी संभाजी आक्कलवाड हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या सेवा गोरव सोहळ्याचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे शाखा अधिकारी पि.जी.वाडेकर ,बाबुराव पवार यांनी केले होते.
या सोहळ्यास नवनिर्वाचित चेअरमन, शेतकरी , व्यापारी बांधव होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उध्वजी बसवंते होते ते बोलतांना म्हणाले की नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची गेल्या काही वर्षांपूर्वी सारखी परिस्थिती राहिली नाही आता खुप मोठी सुधारणा झाली आहे. कर्मचारी कमतरता असली तरी शेतकऱ्यांना सेवा देण्यात बॅंक कुठेही कमी पडत नाही. शेतकऱ्यांची उसाचे, अनुदानाचे लाखो रुपये बॅंकेत जमा होत असतात परंतु शेतकरी सर्व रक्कम उचलून इतर बॅंक मध्ये जमा ठेवतात हि पध्दत चुकीची आहे. याच बॅंक मध्ये शेतकऱ्यांची रक्कम सुरक्षित राहते ज्यावेळी पाहिजे तेंव्हा लाखो रुपये रक्कम मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी याच बॅंकेशी आपला व्यवहार ठेवावा आणि येथील बॅंकेकडून शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने वागणूक मिळत असते परंतु काही कारणाने बॅंकेला बदनाम करण्याचे काम सुरू आहे ते बंद झाले पाहिजे याची जबाबदारी नवनिर्वाचित चेअरमन यांनी घ्यावी व आपल्या गावातील शेतकऱ्यांत बॅंक बाबत जागृती करून दिली पाहिजे असेही ते म्हणाले व संभाजी आक्कलवाड यांनी आजपर्यंत अतिशय चांगली सेवा दिली त्यामुळे त्यांचा सेवा गोरव सोहळा होत आहे असेही मनोगत व्यक्त केले. यावेळी डि.व्ही.वानखेडे , सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर,सरपंच मारोती वाडेकर, अवधूत पाटील, ब्रम्हानंद पाटील, दिंगाबर पाटील वानखेडे, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. संचलन बाबुराव पवार यांनी केले तर आभार शाखा अधिकारी वाडेकर यांनी मानले.
