हिमायतनगर प्रतिनिधी/ सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती कारला ग्रामपंचायत कार्यालयासह बौद्ध विहारात साजरी करण्यात आली आहे.
कारला ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन करून सरपंच गजानन कदम यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपसरपंच रोशन धनवे,तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, सदस्य सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, गजानन मिराशे,आनंद सुर्यवंशी, सुरेश चपलवाड, दत्ता चिंतलवाड, अगंद सुरोशे, मारोती जुंकूटवाड,साहेबराव घोडगे उपस्थित होते.
कारला येथील बौद्ध विहारात पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व पंचशिला ग्रहण करून जयंती साजरी केली. यावेळी सरपंच गजानन कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, सोपान बोंपीलवार, उपचेरमन संजय घोडगे, उपसरपंच रोशन धनवे,संजय गोखले, सुनिल घोडगे,उतम कांबळे, नाथा चवरे, मधूकर घोडगे, रामराव हानवते, अगंद सुरोशे , रामेश्वर यमजलवाड, ग्यानबा इटेवाड, नागसेन गोखले, गौतम कांबळे, किसन रावते, साहेबराव घोडगे, रामराव पाटील, संदीप वाघमारे, पंजाब कांबळे, जांबुवंत मिराशे, संभाजी सुर्यवंशी, देवानंद नरवाडे, संदेश कांबळे, मारोती घोडगे, यांच्यासह गावातील नागरिक व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकारी यांचा जयंती मंडळ कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
