युवा सेनेच्या जिल्हा समन्वयक पदी विशाल राठोड यांची निवड

हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरासह ग्रामीण भागात  युवा सेनेचे काम अग्रेसर राहून केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील जिल्हा समन्वयक म्हणून  विशाल राठोड यांची नियुक्ती केली आहे. 
      हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात शिवसेना पक्षाचे काम युवा सेनेच्या माध्यमातून विशाल राठोड यांनी सुरू केले. त्यांनी ग्रामीण भागात युवा सैनिकांना शिवसेना पक्ष बांधनी कशी करावी माहिती देऊन प्रत्येक कार्यकर्ता जोडण्याचे केले आहे. तालुका युवा सेनेचा अध्यक्ष पदावर असताना त्यांनी शिवसेना पक्षासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा कार्यक्षेत्रातील जिल्हा समन्वयक म्हणून विशाल राठोड यांची नियुक्ती केली आहे . त्यांच्या या निवडीबद्दल माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, कृष्णा पाटील, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, यांच्यासह ग्रामीण भागातील व शहरातील शिवसैनिकांनी अभिनंदन कौतुक केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.