हिमायतनगर प्रतिनिधी(दत्ता पुुुपलवाड) छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याच्या निमित्ताने वारंगटाकळी येथे भव्य कब्बडीचे खुले सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून याचा कबड्डी खेळाडू प्रेमिंनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी कबड्डी चे खुले सामने आयोजित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष राठोड, परमेश्वर गोपतवाड,जनार्दन ताडेवाड, सोपान बोंपीलवार, मुंडे सर,चिखले सर यांची उपस्थित असणार आहे. या कबड्डी स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21111 आ. जवळगावकर यांच्या कडून, द्वितीय बक्षीस 15555 सरपंच दयाळ गिरी, पोलीस पाटील आवदुत पाटील, ग्रामसेवक काळे यांच्या कडून, तृतीय बक्षीस 11111 तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग आडे, बालाजी आबेंपवाड, प्रकाश हाके, विश्वास कानोटे,आबाराव पाटील, इस्माईल मिस्त्री यांच्या कडून अशी तिन बक्षीस ठेवण्यात आली आहेत. तर इतर बक्षीसे 700 मनोहर कांबळे, 500प्रविण जाधव, 500 दत्ता पुपलवाड, 500 दिलीप हाके, गोविंद कदम 300 अशी आहेत. या शिवजयंती सोहळ्याचा व कबड्डी स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक अध्यक्ष मनोज कदम, उपाध्यक्ष अर्जुन आडे, सचिव राजु जैस्वाल, सहसचिव बालकिशन चितलवाड, कोषाध्यक्ष संतोष आंबेपवाड, दत्ता पुपलवाड, सुरज चितलवाड, आवदुत कानोटे, सुरज टोकलवाड, विजय हाटे, गोपाळ जैस्वाल यांनी केले आहे.
