धानोरा, कौठा, पेडांवरून अवैध रेती उपसा सुरू- अवैध रेती विक्रीत राजकीय पदाधिकाऱ्यांची भागीदार.

हिमायतनगर प्रतिनिधी/ धानोरा रेती पेंडावरुन दिवस रात्र परराज्यातील मजुरा मार्फत नदी पात्रातील पाण्यातून अवैध रेती उपसा सुरू असुन यात काही राजकीय नेत्यांची देखील भागीदारी असल्या कारणाने तलाठी मंडळ अधिकारी देखील त्यांच्यात सहभागी असल्याचे माहिती आहे. यामुळे प्रशासन देखील आंधळ्याची भुमिका घेऊन गप्प असल्यामुळे मोठ्या  प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. 
      हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्र भरून असले तरी रेती तस्करांनी एक नविन शक्कल लढवून परराज्यातील मजुरांच्या सहाय्याने अवैध रेती उपसा करून शासनाचा लखोंचा महसूल बुडवत आहेत. उपविभागीय अधिकारी यांच्यासह तहसीलदार यांनी अवैध रेती उपसा होत असतांना देखील गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यातील धानोरा येथील पेंडावरुन दिवस रात्र पाच ते सहा ट्रक्टर लाऊन परराज्यातील मजुरांच्या सहाय्याने पाण्यातून रेती उपसा करण्यात ऐत आहे. 
मजुरांना केवळ पाचशे रुपये मजुरी देऊन हजारो रुपयांची रेती त्यांच्या हातुन उपसा करण्यात येत आहे. या सज्जाचे तलाठी मंडळाधिकारी यांनी देखील या रेती तस्करांना काही हप्ता ठरवून संमती दिली असल्याची माहिती एका रेती विक्रेत्यांकडून मिळाली आहे. तर या पेंडावरुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू असुन या पेंडावरुन ट्रक्टर चालविण्यासाठी प्रती ट्रक्टर 20 हजार रुपये या प्रमाणे दोघा राजकीय पदाधिकारी यांची देखील भागीदारी  असल्याची माहिती एका ट्रक्टर चालकांनी दिली आहे. जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन तहसील प्रशासनाचे कान टोचणे गरजेचे आहे. उपविभागीय अधिकारी यांचे पथही या भागात फिरकले नसल्याने प्रशासानाविरुध्द रोष व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.