वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीचा सूर हरपला- खासदार हेमंत पाटील

हिंगोली/नांदेड/यवतमाळ : वसंत पंचमीच्या दिवशी महर्षी व्यास यांना बारा वर्षे तपश्चर्या केल्यानंतर देवी स्वरस्वती प्रसन्न झाली होती. म्हणून वसंत पंचमी हा सरस्वती मातेचा जन्मदिवस मानल्या जातो. स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या गळ्यामध्ये सरस्वतीचा वास होता, अश्या गान सरस्वतीचे वसंत पंचमीच्या दिवशी दुःखद निधन होणे, मनाला चटका लावून जाते.अश्या शब्दात खासदार हेमंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
          हिंदु धर्म संस्कृतीत वसंत पंचमीचे अनन्य साधारण महत्त्व आहे, या दिवशी देवी सरस्वतीचे पुजन करून नवजात बालकांकडून ॐ अक्षर लिहुन शिक्षण देण्यास सुरूवात करतात,खर तर लता दिदी यांना साक्षात सरस्वती प्रसन्न होती, अस म्हणायला हरकत नाही.
     यावेळी स्व.लता दिदींच्या आठवणींना उजाळा देतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले की,आषाढी महोत्सवाच्या निमित्ताने लता दिदींना नांदेडला आमंत्रित करण्याची माझी मनापासून ईच्छा होती.याबाबत अनेकदा त्यांना संपर्कही साधला होता, परंतु वयोमानाने व तब्येत साथ देत नसल्याने इच्छा असूनही येता आले नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखविली होती.त्यांच्या जाण्याने गायन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, ती कदापिही भरून निघनार नाही. अशा शब्दात हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी स्व. लता दिदी मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.