हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला -बोरगडी शिवारात चोरट्यांनी आखाड्यावर लक्ष करीत शेतकऱ्यांच्या शेतातील आखाडा फोडून पाच कुंठल कापूस चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्यांनी चोरट्यांचा पाठलाग करीत आरडाओरड केली असता चोरट्यांनी कापसाचे गाठोडे रस्त्यावर टाकून पळ काढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस मिळाला आहे.
हिमायतनगर तालुक्यात चोरट्यांनी सोयाबीनसह, तुर,कापूस चोरीच्या घटना वाढत असून.सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास कारला येथील शेतकरी गोविंद सुरोशे यांच्या शेतातील आखाड्यातील कापसाचे गाठोडे चोरट्यांनी पसार केले . शेतकरी घराकडे गेल्याची संधी साधत चोरट्यांनी आखाडा फोडला त्यातील जवळपास पाच कुठंल कापसाचे गाठोडे घेऊन हिमायतनगर बोरगडी रस्त्याने चोरटे निघाले असता गावाकडून शेतकरी जागलीला आले. आखाडा फोडल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी शेजाऱ्यांना आरडाओरडा करीत पाठलाग केला.व यामध्ये चोरट्यांनी चोरलेला कापूस जाग्यावरच टाकून पळ काढला आहे. पोलीस निरीक्षक व यांनी तात्काळ पोलीस गाडी पाठवून घटनेची माहिती घेऊन शेतकऱ्यांना केलेल्या मदतीने चोरट्यांनी लांबवलेला कापुस शेतकऱ्यांना मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना प्रयत्न फसला असला आहे. तरी याच शिवारातील शेतकरी बाबुराव राहुलवाड , मुकुंदराव सुरोशे, शब्बीर भाई, विलास सुरोशे यांचे आखाडे देखील फोडून शेती अवजारे चोरी केले असल्याची माहिती शेतकरी अगंद सुरोशे यांनी दिली आहे. कारला बोरगडी शिवारात चोरट्यांनी अनेकदा आखाड्यातील शेती अवजारासह बैल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
