सिरंजनी येथील युवकांच्या स्वच्छता श्रमदानातून गाडगेबाबांची जयंती साजरी."माझा गाव, सुंदर गाव" या अभियानात प्रथम क्रमांक मिळवण्याचा युवकांचा संकल्प

हिमायतनगर प्रतिनिधी (साईनाथ देशमाने)  तालुक्यातील सिरंजनी येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रेरणेतून ग्राम चैतन्य अभियान राबविण्यात येत आहे ह्या अभियानातून गावातील मुख्य ठिकाणचे उकिरडे श्रमदानातून गावाबाहेर काढण्याचे वृत्त गावातील युवकांनी अंगिकारले आहे. आज राष्ट्रसंत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले असून असंख्य युवकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
      शिक्षण, आरोग्य, उद्योग आशा अनेक समस्येवर आपल्या कीर्तन सेवेतून गावोगावी फिरून जनजागृती करणारे महान कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 23 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने सिरंजनी येथील युवकांनी शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या *माझा गाव, सुंदर गाव* या अभियानात सहभाग घेतला असून गावात स्वच्छता अभियान राबवून गेल्या अनेक महिन्यापासून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.. या जयंती निमित्ताने येथील युवकांनी सिरंजनी ला प्रथम पारितोषिक मिळवून आणू आसा संकल्प सुद्धा केला आहे.
       सिरंजनी चे नवनिर्वाचित सरपंच सौ. मेघा पवन करेवाड यांच्या पुढाकाराने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक सिरंजनी येथे युवकांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले व गावातील जागृत देवस्थान असणाऱ्या मसाई मंदिर येथे श्रमदानातून स्वच्छता केली आहे व गाडगेबाबा यांनी स्वच्छतेला महत्व दिले असून सर्वांनी स्वच्छतेचे पालन करने हीच महापौरुषाच्या पावन स्मृतीस खरी मानवंदना आहे असा संदेश सिरंजनी च्या युवकांनी दिला.
      यावेळी सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, ग्रामपंचायत सदस्य अविनाश आंचेटवार, गणपत पाटील, रामेश्वर जाधव, अशोक पुरी सह गावातील असंख्य युवक व धोबी समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.