मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजयी 13 पैकी 13 उमेदवार विजयी

हिमायतनगर प्रतिनिधी(दत्ता पुपलवाड) तालुक्यातील मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले सायंकाळी निकाल घोषित झाला असता यामध्ये कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,कोहळीकर गट लढले असले तरी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या पॅनल चे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले आहेत. 
हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , कोहळीकर गट एकत्र होता शिवसेनेचे पॅनल स्वबळावर होते. मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी दि. 23 फेब्रुवारी रोजी मतदान झाले सायंकाळी निकाल घोषित करण्यात आला यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाले आहेत. येथील निवडणूक अटीतटीची झाली असून हिमायतनगर येथील सोसायटीचा निकाल लक्षात ठेवून मंगरूळ सोसायटीचा निकाल कांग्रेस गटाला शेतकऱ्यांनी दिला असुन सर्वच उमेदवार विजयी करून दिले आहेत. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांंच्या नेेेेेतृत्वाखाली पॅॅॅनल होते .
निवडणूक निवडणुकीसाठी शिवसेनेच्या पुढाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले असले तरी  पराभव झाला असल्यामुळे मंगरूळ चा निकाल  जि. प.निवडणुकीसाठीही धक्कादायकच म्हणावा लागेल असा आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद ची रंगीत तालीम या सोसायटीच्या निवडणुकीत दिसून आली असून काही जागेवर कांग्रेस ला तर काही ठिकाणी शिवसेनेला सोसायटीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी कांग्रेस पक्षाच्या च्या ताब्यात अनेक सहकारी सोसायट्या आहेत. सोसायटीच्या निवडणुकीत कोहळीकर समर्थकांची मदत मिळाली आहे. मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीवर 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाल्याबद्दल सर्वच उमेदवारांचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.