हिमायतनगर प्रतिनिधी/ गेल्या कार्यकाळात शहरातील अनेक कामे मार्गी लागले असुन कच्चे रस्त्याची कामे पूर्ण करून शहरातील विकास कामे पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे उर्वरित राहिलेल्या कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण करणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर शहरातील तिन कोटी रुपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन रविवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी तहसीलदार डि एन. गायकवाड, शाखा अभियंता तुगंनवार, डांगे उपस्थित होते. या भुमिपुजन प्रसंगी बोलतांना जवळगावकर म्हणाले की शहरात तिन कोटी रुपयांच्या निधीतून कामे होणार आहेत. काही भागातील रस्ते नाली बांधकामासाठी आणखी निधी उपलब्ध करून कामे होणार आहेत. शहरातील जनतेनी वेळोवेळी कांग्रेस पक्षावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठिशी राहून आशिर्वाद दिला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकासात्मक कामांवर भर देऊन शहरातील कामे पूर्ण करणार असल्याचे आ. जवळगावकर यांनी सांगितले. यावेळी सुभाष राठोड, अ. अखील अ. हमीद,सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर,समद खान ,एस. एस. पळशीकर, शेख रफिक भाई,डॉ. चव्हाण, फेरोज खान, शाम ढगे, संजय माने, आनंता देवकते सुभाष शिंदे, शेख रहिम भाई, अभिषेक लुटे,असलम भाई, अनिल पाटील शिरपलीकर, पंडित ढोणे,डोल्हारी सरपंच कदम,माने,अशोक आनगुलवार, अनिल पाटील, यांच्यासह शहरातील नागरिक व कांग्रेस कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
