शिवसैनिक संतोष पुलेवार चा आदर्श कार्यकर्त्यांनी घ्यावा-जिल्हा प्रमुख कोकाटे स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त स्वखर्चातून अपंगांना साहित्य वाटप

हिमायतनगर प्रतिनिधी / मौजे पोटा येथील शिवसैनिक संतोष पूलेवार यांनी हिंदुहदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त स्वखर्चाने येथील 3 अपंग बांधवांना व 4 कर्णबधिर महिलांना मशीन देऊन एका वेगळ्या पद्धतीने शिवसेना पक्ष प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता भाऊ कोकाटे सह युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात   आले

      हिमायतनगर तालुक्यासह शहरात शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठिक ठिकाणी शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. मौजे पोटा येथील निष्ठावंत शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी राजकारणा बरोबर समाजकारण करण्याचा उद्येश्य ठेवून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवारी आपल्या स्वखर्चातून येथील अत्यंत गरजू असलेल्या 3 अपंग बांधवांना सायकल, व 4 कर्णबधिर महिलांना कर्णध्वनीयंत्र व अपंगांना काठी देऊन एका वेगळ्या पद्धतीने शिवसेना पक्ष प्रमुखांना अभिवादन केले आहे. या जयंती प्रसंगी विचार व्यक्त करतांना जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे म्हणाले की स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणा बरोबर समाज कारणाला जास्त महत्त्व दिले होते त्यामुळे त्यांची आजही जणसांमान्यात ओळख आहे.त्यांचांच विचार मनाशी बाळगून शिवसैनिक संतोष पुलेवार यांनी देखील अपंग व्यक्तींना मदतीचा हात दिला त्यांचा आदर्श कार्यकर्त्यांनी घ्यावा असे कोकाटे यांनी सांगितले. 
 यावेळी उपस्थित नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे व युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील , विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे,संदीपराव देशमुख, माधवराव देशमुख, डॉ. सूर्यकांत माने, अप्पाराव पाटील सूर्यवंशी, श्रीराम पाटील , साहेबराव पतंगे, बाळासाहेब पतंगे, दीपक चव्हाण ,करेवाड , शाहीर वानखेडे ,उत्तमरावजी माने ,प्रल्हाद सूर्यवंशी, माधव डोकळे ,धोंडीबा घुमणर, युवराज देशमुख, हनुमंत देशमुख ,बाळूभाऊ खडके, रामभाऊ नरवाडे, गजानन वालेगावकर, अजिंक्य पिनलवार, सतीश पवार ,बंडू देशमुख ,अमोल सूर्यवंशी ,अनिल जाधव ,साईनाथ जाधव, बजरंग सुरेवाड,शिवराज अंबुलगे, सुनील जाधव ,जाधव, सुदर्शन माने, सोनू सोळंके ,मनोहर अलेवार,यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.सूत्रसंचालन गजानन सूर्यवंशी यांनी केले तर आभार संतोष पुलेवार यांनी व्यक्त केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.