मोकाट जनारांनी उन्हाळी पेरलेले सोयाबीन खाल्ले

हरभरा खाल्ला म्हणुन पेरले होते उन्हाळी सोयाबीन


हिमायतनगर|
मोकाट जनावरांनी जमिनीतुन वर आलेला हरभरा खावुन उनगवल्यानंतर येथिल शेतकऱ्याने उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली होते. कोळपनीला आलेल्या सोयाबीनवर मोकाट गुरांनी ताव मारला. त्यामुळे चांगल्या उत्पन्नाची हमी असलेल्या शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरले आहे. या संबंधीची तक्रार नगरपंचायतीचे प्रशासक तहसिलदार डि. एन. गायकवाड यांचेकडे करण्यात आली आहे.


शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. रस्त्यावर फिरनारी जनावरे मोकाट नसुन कोणत्या ना कोणत्या मोकाट पशुपालकाची आहेत. कधी रस्त्यावरील वाहन चालक व पादचाऱ्यांना , कधी शहरा नजीकच्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. नगरपंचायत कडे तक्रार करूनही यावर कायम स्वरूपी तोडगा निघला नाही.


मोकाट जनावरे कोंडायला कोंडवाडा कुठे ठेवला? अस म्हणण्याची वेळ त्रस्त शेतकऱ्यांवर आली आहे. मोकाट जनावरांच्या त्रासामुळे शेती विकणे आहे. असा फलक देखिल मागील काळात पहावयास मिळाला होता, तेंव्हा नगरपंचायतीवर सत्ताघारी होते. आता नगरपंचायत प्रशासकांच्या ताब्यात असल्याने कारभार रामभरोसे आहे, तेंव्हा पासुन शेतकरी त्रस्त झालेले आहेत.


मोकाट जनावरांनी शेख मोहेद्दीन शेख मिया यांचे शेतातील जमिनीतुन वर आलेला हरभरा खावुन फस्त केला. त्यामुळे त्यांनी हरभरा पिक मोडुन उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली, त्याचेही जनावरांनी नजर चुकवत रात्री बेरात्री येवुन खावुन नुकसान केले आहे. गरीब शेतकरी असुन मला पिकाचे नुकसान परवडनारे नाही, असे तहसिलदार डि.एन. गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मोकाट जनावरे ताब्यात घ्यावीत अन्यथा जनावरे पकडुन गोशाळेत नेवुन सोडणार असल्याच निवेदनात नमुद केल आहे. या निवेदनावर शेख मोहेद्दीन शेख मिया, दिलीप गुड्डेटवार, नारायण गुड्डेटवार, राजु तांबोळी, पांडुरंग गुड्डेटवार, गोविंद पवार, पांडुरंग ढोणे, रवि वानखेडे, रामराव डाके, विठ्ठल कोळेकर यांचेसह बावीस शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.