करीअर मार्गदर्शन कार्यक्रम 2022: हिमायतनगर जिल्हा नांदेड
शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षणातच करिअर आणि व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शन गरजेचं - विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख..
आज दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी प्रगती-गंगाई कोचिंग क्लासेस हिमायतनगर तर्फे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम विद्यार्थी फाउंडेशनचे विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख यांची उपस्थिती होती..*
पारंपारीक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राच्या पलीकडे, कोरोना काळात बदलत्या वेळेनुसार विविध क्षेत्रातील अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतांना , स्मार्टफोनच्या काळातील स्मार्ट करिअर, व्यवसाय उद्योजकता, सामाजिक सेवा क्षेत्रातील विविध संधी, व्यवसायभिमुख नवी शिक्षण प्रणाली, अभ्यास नियोजन- पद्धती, इंटरनेटच्या काळातील आजचा विद्यार्थी , स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं करिअर इ.. आदि सोबत करीअर निवडताना आपलं व्यक्तीमत्व, ईच्छा-आवड, छंद, आपल्या क्षमता ओळखताना व्यक्तिमत्त्व विकास, विद्यार्थी-पालकांचं समुपदेशन ह्या संदर्भात विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख ह्यांनी हसत-खेळत मनोरंजनामात्मक आणि सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं.
ह्या कार्यक्रमाला दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतांना आपले ही प्रश्न मांडले. कार्यक्रमाचं संयोजन प्रगती-गंगाई कोचिंग क्लासेस हिमायतनगर तर्फे करण्यात आलं होतं.
