हिमायतनगर प्रतिनिधी/ इंग्रज आणि निजामाच्या राजवटीला ताकदीने लढा देणाऱ्या पराक्रमी वीरयोद्धे हौसाजी व नोवासजी नाईक यांच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा असून हदगाव तालुक्यातील नाव्हा येथील गौरवशाली इतिहासाचे जतन होण्याची आणि त्यांचा खरा इतिहास समाजासमोर येण्याची गरज आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले . शौर्य भूमी नाव्हा येथे आयोजित राजे नोवसाजी नाईक व त्यांचे सहकारी स्वातंत्र्य योद्धे यांचा स्मृतीसोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ. माधववराव पाटील जवळगावकर , माजी शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर , मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. यशपाल भिंगे, माजी आ. रामराव वडकुते, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, नेताजी पालकर याचे वंशज अशोकराव पालकर, नवसाजी नाईक यांचे वंशष डॉ प्रकाश नाईक,राजे नेमाजी शिंदे याचे वंशज पार्थ शिंदे, विर नागोजी नाईक यांचे वंशज व्यंकटराव नाईक, तालुका प्रमुख श्यामराव चव्हाण , युवा सेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटिल आष्टीकर, जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, ऍड . रवी शिंदे , सभापती मादाबाई तमलवाड, वसंतराव देशमुख भाऊसाहेब माडलापूरकर,ऍड . शेळके साहेब , जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील, (प. स. सदस्य पंढरीनाथ ढाले , जि. प. सदस्य अरूणाबाई सरोदे. उपसभापती शंकरराव मेंडके , निळू पाटीलदेवानंद पाईकराव नाव्हा गावचे सरपंच पुंडलिक नरवाडे, निळकंठ कल्याणकर, महेंद्र देमगुंडे, यांची उपस्थिती होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . १८ व्या शतकात नाव्हा भागात पराक्रमी वीरयोद्धे हौसाजी व नोवासजी नाईक यांनी स्वतःचे मजबूत वाटण बनवून निजाम आणि इंग्रजी सत्तेला जेरीस आणले होते आणि आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले होते . परंतु आजपर्यंत त्यांचा खरा इतिहास आपल्यासमोर आलेला नाही . तो येणे खूप गरजेचे आहे. प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे आभार त्यांच्याकडे संशोधक वृत्ती असल्यामुळे त्यांनी तामसा आणि परिसरातील हुतात्म्यांच्या इतिहासाचे संशोधन करण्यासाठी समिती स्थापन करावी . असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. अश्या कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने आपला इतिहास जागविण्याचा प्रयत्न होतो. कारण इतिहास विसरणाऱ्यांचा भविष्यकाळ घडत नसतो त्यामुळे आपला इतिहास जिवंत ठेवून आजच्या तरुणांनी आपला वर्तमान आणि भविष्यकाळ घडवावा. म्हणून स्वातंत्र्य लढा हा फक्त इतिहास नसून भविष्याला प्रेरणा देणारे तत्कालीन योध्दाचे कर्तव्य आहे.आज वर्तमानामध्ये तरुणांनी इतिहास लक्षात ठेवून कुटुंब, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देशसेवेसाठी प्रामाणिक प्रयत्न करावे अशी विनंती खासदार हेमंत पाटील यांनी लोकसेवक या नात्याने उपस्थितांना केली. आजपर्यंत आपल्याला जगभरातील देशांच्या क्रांत्या शिकविल्या गेल्या परंतु आपल्याच भागातील वीर योद्यांचा इतिहास समोर आला नाही. हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे या उद्देशाने ठिकठिकाणी हुतात्मा स्मारक स्थापन करून अभिवादन केले जाते यामुळे समाजाला प्रेरणा मिळते. असे सांगत खासदार हेमंत पाटील यांनी विविध ऐतिहासिक दाखले दिले.
