भरधाव वेगातील कारणे दुचाकीस्वाराला उडविलेल्या; त्या गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

हिमायतनगर तालुक्यातील वडगाव जवळील दरेगाव पाटीच्या १०० मीटर अंतरावरील दुर्घटना



हिमायतनगर| हिमायतनगर-भोकर राष्ट्रीय महामार्गावर नांदेडकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगातील पांढऱ्या कारणे दुचाकीस्वाराला उडविले आहे. हि घटना दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली असून, यात दुचाकीस्वार गंभीर रित्या जखमी झाला असून, त्यास पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात होते अखेर उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 


हिमायतनगर- भोकर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्याने रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढला असून, अनेक अपघात घडत आहेत. या महामार्गावर दोन दिवसापूर्वी शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणारा ऑटो उलटून ९ जण जखमी झाले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी याचा राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक दुर्घटना घडली आहे. नित्याप्रमाणे भोकरहून हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु.येथील मनीषा आश्रम शाळेवर काम करणारा सेवक सुखदेव रेनबा दर्शनवाड वय अंदाजे ४० वर्ष हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच २६ बी एच ३६०४ वरून सकाळी ९ निघाला होता. दरम्यान हिमायतनगर तालुक्यातील वडगाव जवळील दरेगाव पाटीच्या १०० मीटर अंतरावर आला याचवेळी हिमायतनगर तालुक्यातील कामारीहून नांदेडकडे जाणारी भरधाव वेगातील पांढरी कार क्रमांक एम एच १४ जी एस ४०८९ ने येऊन दुचाकीला जबर धडक दिली आहे.


या अपघातात दुचाकीस्वार सुखदेव दर्शनवाड वाहनसह रस्त्यावर पडल्याने त्यास गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत जबर मार लागल्याने नागरिकांनी तात्काळ भोकर येथे हलविले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जखमीला नांदेडला हलविण्यात आले आहे. अशी माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी   बोलतांना दिली. या घटनेची माहिती तामसा पोलिसांना देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. दुर्घटनेत दुचाकींचा चकणा चूर झाला असून, कारच्या चालकाच्या समोरील भाग चपटून नुकसान झाले आहे. पोलीस दाखल झाल्यानंतर घटनेचा पंचनामा करून पुढील कार्यवाही होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.