पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे अवाहन
हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील सिबदरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्री संकट मोचन दक्षिण मुखी हनुमान मंदिर नांदेड हनुमंत रायाचे कृपेने दि. 11 डिसेंबर ते मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी 18 डिसेंबर मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा पर्यंत ग्रामस्थांच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असुन पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यात असलेल्या सिबदरा गावात भक्तीमय वातावरणात ग्रामस्थांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या सप्ताहातील दैनंदिनी कार्यक्रम दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 7 ते 10 ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण व्यासपीठाचे प्रकाश गणपत बाचकलवाड हे वाचन करणार आहेत.
या सप्ताहातील किर्तनकार ह.भ.प. संजय महाराज करे आंबडापुरकर , ह.भ.प. डॉ.लक्ष्मीकांत रावते , ह.भ.प. कृष्णा महाराज चिखलीकर, ह.भ.प. रूपालीताई पवनेकर , ह.भ.प. पंढरीनाथ महाराज पळसगावकर, ह .भ .प.माधव महाराज बोरगडीकर,यांचे होणार आहे तर काल्याचे किर्तन ह .भ .प .भिमराव महाराज फुटाणकर यांचे होणार आहे.
दि. 18 डिसेंबर रोजी शनिवार सकाळी 07 वा. परमेश्वर महाराज बडवे यांच्या हस्ते हनुमंतरायाचा अभिषेक होईल, नंतर टाळ-मृदंगाच्या गजराने ग्राम प्रदक्षिणा व 11 ते 1 काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सागंता होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन सिबदरा ग्रामस्थांनी केले आहे.
