सावधान मोबाइल येणाऱ्या व्हिडिओ तुन फसवणूक

 २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून सिरंजणीच्या युवकाची फसवणूक

प्राप्तिकर भरण्यासाठी युवकाला ६ हजार रुपये भरण्यास सांगितले

हिमायतनगर प्रतिनिधी/.२५ लाखाची लॉटरी लागल्याचे सांगून युवकाची ६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील युवकांसोबत घडला आहे. याबाबत त्याने पोलिसात तक्रार दिली असल्याचे सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी गावातील धम्मा राऊत या युवकाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे संदेश अज्ञात नंबरवरून मोबाईलवर पाठवण्यात आले. त्याचा प्राप्तिकर (टॅक्स) भरण्यासाठी युवकाला १२ हजार २०० रुपये भरण्यास सांगितले. सुरुवातील त्यापैकी ६ हजारांची रक्कम युवकाने बँकेतुन फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात भरली. त्यानंतर राहिलेली रक्कम भरण्यासाठी वारंवार धम्मा नामक युवकाला फोन येत आहेत. यातून आपली फसवणूक झाल्याचे समजताच युवकाने हिमायतनगर पोलिसांत तक्रार दिली आहे. आपल्यासारखी इतर कुणाची फसवणूक होऊ नये यासाठी आपण तक्रार दिल्याचे युवकांनी सांगितले.

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी येथील धम्मा राऊत नामक युवकाची व्हाट्सएपच्या माध्यमातून एका बैंकेच्या अंभेरील व आतील कैसे काउंटर, कैसम मोजमापण यंत्राचे व्हिडीओ क्लिप्स, संदेश, आणि सत्यात वाटण्यासाठी प्रत्यक्ष लाभधारक भासूं त्याचे व्हिडीओ संभाषण पाठवून फसवणूक करण्यात आली.

सुरुवातील तुम्हाला २५ लाखाची लॉटरी लागली असे सांगून त्याच्याकडून ०६ हजार रुपये उकळण्यात आले आहे. त्यानंतर देखील लॉटरी लागल्याचे सांगून वारंवार पैसे मागितले जात असल्याचे धम्मा राऊत यांनी सांगितले. त्याच्या मोबाईल वर आलेल्या फोटो व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप वरून हे सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ठपणे दिसून येत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.