पळसपुर येथील शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

 हिमायतनगर प्रतिनिधी/


तालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी उत्तम पुजांराम गायकवाड वय 45 या अल्पभूधारक शेतकऱ्यांने  नापिकी व कर्जबाजारी मुळे विष प्राशन केले होते उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मंगळवारी निधन झाले आहे . 

पळसपुर येथील  उत्तम पुजांराम गायकवाड या शेतकऱ्यांने दि. 19 डिसेंबर रोजी राहत्या घरी विश प्राशन केले होते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतातील नापिकी  शेतीतील उत्पन्न झाले नसल्याने कर्ज परतफेड कशी करावी या विवंचनेत राहून कर्जबाजारी शेतकऱ्यांने विष प्राशन केले असल्याची माहिती कुटुबिंयानी दिली .

सदरील घटना घडताच शेतकऱ्यांस उपचारासाठी नांदेड येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिन दिवसापासून उपचार सुरू होते परंतु मंगळवारी उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक बहिण दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने पळसपुर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर पळसपुर येथे सायंकाळी 6 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

     


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.