हिमायतनगर विशेष प्रतीनिधी (गंगाधर वाघमारे) तालुक्यातील मौजे दाबदरी ग्राम पंचायत अंतर्गत काळूवाडी तांडा येथील आनेक तरुण दारुने व्यसनाधिन झाल्याने तांड्यातील सामाजिक वातावरण दुषीत होत असल्याचे लक्षात येताच येथील माजी उपसरपंच पांडूरंग आडे यांनी दारूच्या व्यसना पासून अर्थात दारू सोडण्यासाठी व्यसनाधीन झालेल्या तरुणा सोबत एक अनोखा प्रयोग करून व्यसनाधिनतेकडे वळलेल्या तरुणाला बचतीचा मार्ग दाखऊन दारु पासून आलीप्त केले आहे
या बाबत सविस्तर वृत असे की मौजे दाबदरी ग्राम पंचायत अंतर्गत काळूवाडी तांडा येथील ऐन तारुण्याकडे जीवनाक्रम करणा-या व दारुच्या आधिन गेलेल्या25 तरुणाला दारु ही जीवनासह ' कुटंबाचा नाश करणारी बाब आहे त्या साठी तरुणानी दारू पासून दुर राहिले पाहिजे . दारू मूळे घरातील मुला - मूलीवर त्याच्या शिक्षणावर विपरित परिणाम होऊन पुढच्या पिढीवर त्याचा मोठा वाईट परिणाम होते . ही बाब त्यांच्या लक्षात आनुन दिली . रोज दारू पिण्यावर होणारा खर्च जर आपण बचत करू शकलो तर हे पैसे आपल्या भविष्या साठी कामी येतात . त्या साठी आपण सर्वजण एकत्र येऊन एप स्वयं सहाय्यता बचत गटाची स्थापना करू ' त्याच्या माध्यमातून आपली रक्कम जमा करू असी भावना त्या व्यसनाधीन तरुणा मध्ये जागृत करुन माजी उपसरपंच पांडूरंग आडे यांनी व्यसनाधीन झालेल्या तरुणाला बचतीच्या मार्गाला लावले . आज घडीला येथील 25 तरुणानी दारू पासून दुर राहण्याची शपथ घेतली व रोज होणारा दारूवरचा खर्च स्वयं सहाय्यता बचत गटामध्ये जमा करून एक जीवनाचा नवीन मार्ग अंगीकाला आहे .
तांड्यातील तरुणानी दारु पासून आलीप्त राहून बचतीचा मार्ग धरल्याने त्या सर्वांच्या घरात खरी दिवाळी साजरी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
