पळसपुर ग्रामपंचायत कार्यालयास गटविकास अधिकारी यांची भेट
हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील
पळसपुर
येथील ग्रामपंचायतीला प्रभारी गटविकास अधिकारी बळवंत यांनी भेट देऊन
ग्रामपंचायतीच्या कामांचा आढावा घेतला व पळसपुर येथील ग्रामपंचायतीचे काम
समाधानकारक असल्याचे सांगितले. तसेच कोविड १९ लसिकरणाचीही माहीती घेतली
असता ९६ टक्के लसिकरण झाल्याची माहीती प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे
कौतुक केले. तसेच विस्तार अधिकारी चिंतावार यांनी अपात्र यादी क्रं. ड ची
प्रत्यक्ष पाहणी करून सदरील यादी मंजुरीसाठी वरीष्ठांकडे पाठविणार असल्याचे
सांगितले यावेळी सरपंच मारोती वाडेकर, ग्रामविकास अधिकारी साईनाथ कासटवार,
सेवक आबाराव पवार, बाळू वानखेडे, पाणी पुरवठा सेवक राजु चांदनकर, रोजगार
सेवक संजय वाडेकर, पत्रकार दाऊ गाडगेवाड,यांच्यासह गावातील नागरीक उपस्थित
होते.

Batmi khup Chan thank you
ReplyDeleteसरपंच धन्यवाद
Delete