कोविड लसीकरणासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा सरपंच मायाबाई गिरी यांचे आवाहन
हिमायतनगर प्रतिनिधी/(दता पुपलवाड) मागील दोन वर्षापासून जगभरामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातल्याने जगातील सर्व मानव जातीला वेठीस धरले आहे. भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून कोराणा विषाणूला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्या जात आहेत. या विषाणुपासून प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण व्हावे या दृष्टिकोणातून देशात कोविड लसिकरण करणे चालू आहे.जे नागरीक लसिकारणापासून वंचित आहेत त्यांना आरोग्य विभागाकडून प्रत्येक नागरीकांच्या घरी जाऊन लसिकरण करणे चालू त्या अनुशंगाने हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथे प्रत्येक घरी जाऊन नागरीकंना लसीचा डोस देण्यात आला. जवळपास ९७% लसीकरण झाले असून उर्वरीत नागरीकाना जागरूक करण्याचे काम चालू आहे. यासाठी सरपंच मायाबाई दयाळगीर गिरी यांच्या नेतृत्वाखाली डाँ. प्रेम वाघमारे, आरोग्य सेविका विद्या दवने मँडम, आशा वर्कर शोभा चिंतलवाड, ग्राम विकास अधिकारी नारायण काळे, पोलिस पाटील अवधुत कदम, मुख्याध्यापक मुंडे सर, स्वस्त धान्य दुकानदार माधव कानोटे, पत्रकार दत्ता पुपलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष पाडूरंग आडे, बालाजी देवकते,बालाजी आंबेपवाड, कृष्णा आंबेपवाड, राम चिंतलवाड यांच्यासह सर्व ग्रामस्थ परीश्रम घेत आहेत.उर्वरित नागरीकांनी कोविड लसीकरणासाठी पुढाकार घेऊन आपले गाव शंभर टक्के पुर्ण करून शासनला मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सरपंच मायाबाई दयाळदयाळगिर गिरी यांनी केले.
