हिमायतनगर प्रतिनिधी(दत्ता पुपलवाड) देशाचे नेते माजी कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्त्य साधून हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वाभिमान सप्ताहात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हिमायतनगर येथील वार्ड क्रं. १ मध्ये दि.9 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ता.अध्यक्ष सुनिल पतंगे ,पक्षाचे युवा नेते आकाश सुर्यवंशी, गणेश रच्चेवार, आशितोष बोरेवाड यांनी कोविड लसिकरण आणि आरोग्य शिबीर घेऊन सर्वसामान्य नागरीकांना मोफत आरोग्य विषयक सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यावेळी डॉ. एस. बी. चव्हाण सर, डॉ गोविंद वानखेडे, डॉ गायकवाड मॅडम, नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, शहराध्यक्ष उदय देशपांडे उपस्थित होते....
सिरंजनी येथेही तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, बालाजीमँकलवाड, सुमेध भरणे यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजीत करून ज्येष्ठ नागरीक बाबुराव गड्डमवार यांचा पक्षाचे बाळासाहेब भोसीकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, तडबिडकर, सुनिल पतंगे, एकनाथ पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच एकंबा येथेही कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
दि. ११ शनिवार रोजी हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनिल पतंगे यांच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले आणि कार्यकर्ता मेळावाही आयोजीत करण्यात आला होता.
आरोग्य शिबीराला खडकी बा. येथील नागरीकांनी उतस्फुर्त प्रतिसाद दिला. डाँ. विकास वानखेडे, डाँ. गोविंद वानखेडे, डाँ परभणकर यांनी शिबीरामध्ये जवळपास ३५० महीला व पुरूषांची तपासणी केली.
तसेच हिमायतनगर येथील गंगाई कोचिंग क्लासेस येथे निबंध स्पर्धा, भाषण कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी यांनी मोलाचे परीश्रम घेतले. आणि विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, शहराध्यक्ष उदय देशपांडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण, नगरसेवक प्रभाकर अण्णा मुधोळकर, व्हीजेएनटीस सेलचे जिल्हा सरचिटणीस दाऊ गडगेवाड, विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी, आकाश सुर्यवंशी, गणेश रच्चेवार, इरफान खान, मुबीन कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सरदार खान यांच्या हॉल मध्ये व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती...
