दोन मुलींना गंभीर दुखापत झाल्याने नांदेडला रुग्णालयात केल दाखल
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावात एस टी महामंडळाची बस सेवा ये-जा करत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आणि शालेय विद्यार्थिनींना खाजगी ऑटो, जीपसारख्या वाहनाने ये-जा करून जीवन यापन करावे लागते आहे. याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा खु आणि पारवा खु.येथील शेकडो विद्यार्थ्यांना येतो आहे. या गावात इयत्ता ७ वि पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थी - विद्यार्थिनींना हिमायतनगर सारख्या शहरच्या ठिकाणी जावे लागते आहे. नित्याप्रमाणे आज दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता पारवा खु आणि पोटा खु येथील विद्यार्थिनीना घेऊन हिमायतनगर येथे शाळेत जाणारा ऑटो राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या करंजी नजीक पलटी झाला आहे.
हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने करण्यात आला असून, रस्ते उंच झाल्याने बाजूला मोठ्या नाल्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पलटी झालेला ऑटो दोन - तीन कोलांटउड्या घेत खड्ड्यात जाऊन पडला. या घटनेत ९ विद्यार्थिनी आणि चालक जखमी झाला आहे. सर्व विद्यार्थिनींना तातडीने हिमायतनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉ.गणेश कदम यांनी सर्व विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार केले. या दुर्घटनेत चालकाचा पायला दुखापत झाली असून, ७ विद्यार्थिनींना किरकोळ मार लागला आहे. त्यापैकी सौंदर्या जाधव व ममता जाधव या विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले आहे. ऑटोमधील सर्व विद्यार्थिनी ह्या हिमायतनगर येथील हुजपा शाळेत शिकणाऱ्या असून, इयत्ता ८ ते १० वि वर्गातील असल्याचे पालकांनी संगितले आहे.
या अपघातात ऑटोच्या समोरील काच फुटून चकणाचुर झाला असून, ऑटो अनेक ठिकाणी चापटला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पारवा खु. हे गाव तालुक्यातील कामारी जिल्हा परिषद गटात येणारे असून, जवळगाव आणि पोटा बु.पासून ३ किमी अंतरावर आहे.
याचं पारवा गावच्या बाजूला पोटा खु. हे गाव असल्याने या दोन्ही गावातील नागरिक व विद्यार्थ्यांनी एसटी महामंडळ बस येत नसल्याने अनेक वर्षांपासून खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत. नुकतेच या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून झाले असून, आता एसटी महामंडळाने मानव विकास मिशनची बस सुरु करून विद्यार्थिनींना शिक्षनासाठी मोफत प्रवासाची सोय करून द्यावी. यासाठी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर महोदयांनी विद्यार्थी व गावकऱ्यांची बस अभावी होणारी परवड थांबविण्याकडे लक्ष केंद्रित करून दिलासा द्यावा. अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक शिवाजी जाधव, किशनराव जाधव, गजानन जाधव, लक्षण जाधव, भाऊराव जाधव, अरविंद सुरुवंशी, गौतम वाघमारे, रमेश वाघमारे, विश्वनाथ जाधव, सुरेश पतंगे, यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.
