ग्रामस्थांची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी
हिमायनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील उमीरहिरा तांडा येथील बंद झालेले जिल्हा परिषद शाळा पूर्ववत चालू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी हिमायतनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, हिमायतनगर तालुक्यातील उमीरहिरा तांडा येथील जी.प. शाळा विद्यार्थी संख्येअभावी सन २०१७ मध्ये बंद करण्यात आली होती. आणि येथूनच दोन किमी अंतरावर असलेल्या जी,प.प्रा.शाळा कपाटाची वाडी केंद्र टेभी या शाळेला समाविष्ट करण्यात आली होती. त्यावेळी विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर पुन्हा येथील शाळा पूर्ववत सुरू करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते.
आज आमच्या गावातील जवळपास पंधरा विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद शाळा कपाटाची वाडी येथे शिक्षण घेण्यासाठी ये-जा करत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज जंगल रस्त्याने पायी चालत जिल्हा परिषद शाळा कपाटाची वाडी येथे शिक्षण घेण्यासाठी येणे जाणे करतात. शासकीय तसेच खाजगी वाहन अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. शाळेत दाखल असलेले सर्व विद्यार्थी हे दहा वर्षाखालील आहेत.
जंगलामध्ये नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतो. ऊन, वारा, पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीत पण विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते आहे. तेव्हा मेहरबान साहेबानी आरटीइ एक्ट - 2009 या कायद्याचा विचार करून जिल्हा परिषद शाळा उमरहिरा तांडा केंद्र टेभी हि शाळा पूर्ववत चालू करून आमच्या गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सादर निवेदनाची प्रती गटविकास अधिकारी पंचायत समिती, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना देण्यात आले आहेत.
