शिवसैनिक विठ्ठल भाऊ ठाकरे यांच्याकडून अपंग व्यक्तीस सायकल भेट


राजकारणा पेक्षा समाज कारण महत्त्वाचे -  ठाकरे




हिमायतनगर प्रतिनिधी/.....निवडणुका लागताच अनेक चेहरे समाज कारण करीत असल्याचा देखावा दाखवत असतात परंतु गेल्या दोन वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक  विठ्ठल ठाकरे यांनी प्रथम समाज कारणाकडे लक्ष केले असून त्यांनी आपल्या स्वखर्चाने शहरात प्रभाग क्रमांक 12 मध्ये कामे करीत .त्याबरोबरच एका अपंग व्यक्तींना सायकल भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. राजकारण करताना समाजकारण देखील विसरता कामा नये असेही विठ्ठल भाऊ ठाकरे यांनी बोलताना सांगितले 

शहरातील परमेश्वर गल्लीत राहणारा धोंडीबा सूर्यवंशी हा धावत्या रेल्वेतून पडल्याने  दोन्ही पाय निकामी झाले होते. पाय निकामी झाल्याने त्यास आजपर्यंत  एकाही दात्यांने मदत केली नाही. धोंडीबा सूर्यवंशी यांनी अनेक नेत्यांना सायकल ची मदत मागीतली असल्याचे सांगितले परंतु आजपर्यंत एकाही नेत्यांनी माझ्याकडे लक्ष केले नाही मात्र सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे विठ्ठल भाऊ ठाकरे यांनी स्वत मला मदत केली असल्याचे सांगितले. 

 सदरील अपंग असलेल्या धोंडीबा सूर्यवंशी यांना सायकल भेट दिली याबरोबरच विठ्ठल ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक 12 मध्ये अनेक कामे करून जणसेवा करीत आहेत. त्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकी बदल आकलवाड सर यांनी कौतुक केले आहे. यावेळी शिवसेनेचे संतोष पुलेवार, राम नरवाडे, प्रकाश रामदिनवार, गजानन वानखेडे, देवराव वाडेकर, शक्करगे, देवकते आदींची उपस्थिती होती. 
    दिव्यांगाकडे शासनाने लक्ष केले पाहिजे--ठाकरे 
शहरासह ग्रामीण भागात  असे अनेक अपंगत्व आलेले दिव्यांग व्यक्ति आहेत परंतु स्वार्थी राजकारण्यांनी आजपर्यंत  ग्रामीण भागासह शहरातील दिव्यांग अनेक योजनेपासून वंचित आहेत. येणाऱ्या काळात जनतेनी आपणास संधी दिल्यास संधीचे सोने करून अपंगासह अनेकांना मदत करण्यास सक्षम असणारच आहे. मात्र प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दिव्यांग व्यक्ती ना मदत करावी अशी मागणी विठ्ठल भाऊ ठाकरे यांनी लोकराजा न्युज लाईव्ह शी बोलतांना व्यक्त केली आहे. 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.