नांदेड दि. 2 डिसेंबर:- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिवसभर लोहा, कंधार, भोकर, उमरी आणि मुदखेड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान प्रक्रियेच्या प्रगतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे की नाही याची तपासणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी #संवाद साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. आज जिल्ह्यातील 10 #नगरपरिषदा व एका नगरपंचायतीचे मतदान शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
00000
