हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील मतदारांनी गेल्या नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य दिले मतदारांनी विश्वास दाखवून त्यांच्या आशिर्वादाने सत्ता दिली होती या निवडणुकीत देखील येथील मतदारांचा जनाधार काँग्रेसच्या पाठीशी असल्याने सर्व जागेवर विजय निश्चित होणार असल्याचे माजी आ.माधवराव पाटील यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी कांग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले.माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शहरातील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन नामनिर्देशन दाखल करण्यासाठी परमेश्वर मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात रॅली शक्ती प्रदर्शन करीत नामनिर्देशन दाखल केले.
माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल केले या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना बोलताना जवळगावकर म्हणाले की शहरातील जनतेचा संपूर्ण विश्वास माझ्यावर कांग्रेस पक्षावर आहे गेल्या निवडणुकीत देखील जनतेनी मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी केले होते.पाच वर्षांत जनतेची कामे केली घरकुलासह पाणी पुरवठा योजना मंजूर शहराच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असुन पुढील काळात देखील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी माहिती माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले सर्व उमेदवारांनी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
