हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांच्या रांगा - माजी आ.जवळगावकरांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

हिमायतनगर प्रतिनिधी/-(सोपान बोंपीलवार)
हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक च्या इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केले होते या संदर्भात गुरुवारी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी काँग्रेस कार्यालयात इच्छुक उमेदवारांना बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत . काँग्रेस कार्यालयात दिवसभर इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागलेल्या होत्या काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या वार्डातील विश्वासू नागरिका मार्फत शिफारस करण्यासाठी फिल्डिंग लावली होती.
कांग्रेस पक्षाकडे इच्छुकांनी गर्दी केली असुन कांग्रेस पक्षाकडे मोठा कल दिसत असल्यामुळे वरिष्ठ स्तरावर महाविकास आघाडीची युती असली तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून युतीचा निर्णयाबाबत विचार केला जाणार असल्याचे माजी आमदार जवळगावकर यांनी सांगितले आहे.

हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकी आरक्षण सोडत झाल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी आडवा बैठका घेतल्या होत्या.बुधवारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून आजी-माजी आमदार विद्यमान खासदार देखील आपापल्या बैठका घेऊन आगामी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.
 गुरुवारी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी हिमायतनगर शहरातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती पक्ष कार्यालयात घेतल्या होत्या. काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान माजी आमदार जवळगावकर यांनी दुपारी बारा वाजल्यापासून मुलाखतीला सुरुवात केली होती रात्री आठ वाजेपर्यंत मुलाखती सुरुच होत्या त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांच्या दिवसभर रांगा लागून होत्या नगरपंचायत निवडणुकी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी याकरिता आजी माजी नगरसेवक देखील वेगवेगळ्या पद्धतीने आपली शिफारस करण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे चित्र होते.
काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा अंतिम निर्णय उर्वरित इच्छुकांना मान्य करावा लागणार आहे.या प्रसंगी बोलताना माजी आ.जवळगावकर म्हणाले की मी हिमायतनगर शहरातील प्रत्येक वार्डामध्ये फिरून जनतेच्या मनात जे उमेदवार असेल त्यांचा प्रथम विचार केल्या जाईल तसेच जनतेच्या अडीअडचणी कामांना प्राधान्य दिले अशाच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे देखील माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी सांगितले आहे .
शहरातील जनतेच्या आशिर्वादाने नगरपंचायत वर प्रथमच काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला होता त्यानंतर पुन्हा या निवडणुकीत देखील त्याच पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे मतदारांच्या दारोदारी जाऊन आपण केलेली कामे जनतेसमोर ठेवायची आहेत आणि या नगरपंचायत निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले आहे.
     मी कांग्रेस सोडून कुठेही गेलो नाही जाणार नाही - जवळगावकर
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिमायतनगर भेटी दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की मी या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात ज्याला मोठ केले ते माझ्यासोबत आले नाही तरी हरकत नाही या शहरातील जनतेसाठी मी असणार आहे असे जवळगावकर यांचे नाव न घेता म्हणाले यानंतर माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की ते मोठे नेते आहेत त्यांना मी सोडून कुठेही गेलो नाही आजही कांग्रेस पक्षात आहे सेवठपर्यंत असणार आहे ज्या पक्षांनी मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या मी आमदार झालो त्या पक्षाला सोडून कदापी जाणारं नाही असे प्रतिउत्तर जवळगावकर यांनी दिले आहे...



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.