हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी 16 नामनिर्देशन- नगराध्यक्ष पदासाठी एक दाखल

हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पाचव्या दिवशी एकूण 16 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तर नगराध्यक्ष पदासाठी एकाचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.

. हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनेक उमेदवार आप आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांकडे धाव घेत आहेत.या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू झाली असुन चार दिवसांत एकहाही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पाचव्या दिवशी शुक्रवारी मात्र जवळपास 16 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
     शहरात एकूण 17 प्रभाग असुन प्रत्येक प्रभागातील पाच ते सात राजकीय नेते इच्छुक आहेत.पक्षाकडे उमेदवारी मागणी केली आहे.या निवडणुकीत कांग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे त्यामुळे तर उबाठा शिवसेना गट देखील स्वबळावर निवडणूक लढवणार असुन भाजपा,शिंदे शिवसेना गटाची युती होण्याचे संकेत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील स्वबळाचा नारा देत आहे त्यामुळे हि निवडणुक अतिशय अटीतटीची होणार आहे.
    विधानसभा निवडणुकीत कांग्रेस शिवसेना उबाठा ची युती केली होती परंतु या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती फिसकटली आहे तर भाजपा शिंदे शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकत्र असल्याने महायुतीच्या उमेदवारांना शहरातून मताधिक्य मिळाले होते त्यामुळे या निवडणुकीत देखील काय चित्र असणार आहे हे 21 नोव्हेंबर नंतर कळणार आहे.आजी माजी आमदार खासदार हे निवडणूकीची तयारी जोमाने करत आहेत.कोण उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी सरस ठरणार आहे यासाठी चाचपणी सुरू आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे नाव अद्यापही जाहीर केले जात नाही उमेदवार कोण कसा असणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.पाचव्या दिवशी सायंकाळ पर्यंत एकुण 16 नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणुक माहिती अधिकारी नायब तहसीलदार एस जी पठाण, सहाय्यक माहिती अधिकारी एस डब्लू पांचाळ यांनी दिली आहे.,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.