हिमायतनगर प्रतिनिधी/- सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना सामाजिक बांधिलकी जपुन श्री गणेश उत्सव-2025 मिरवणुकीत डी.जे./ डॉल्बी/ कर्कश आवाजाचे वैजोचा वापर न करता पर्यावरणपुरक ध्वनीप्रदूषण मुक्त मिरवणुक काढणे बाबत पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले होते त्यांच्या अहवानाला तिर्थक्षेत्र बोरगडी गावाने प्रतिसाद देत एक गाव एक गणपती पर्यावरणपुरक ध्वनीप्रदूषण मुक्त मिरवणुक काढत शांततेच्या वातावरणात विसर्जन केले त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी गणेश मंडळाचा डि.जे मुक्त सन्मान पत्र देऊन गौरव केला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी या गावाची एक आदर्श आणि सांप्रदायिक गाव आम्हणून ओळख आहे.
येथील सार्वजनिक बजरंग गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपून व पोलिस प्रशासनाच्या अहवानास मान देऊन श्री गणेश उत्सव 2025
उत्सव सण काळात डिजेचा वापर न करता पर्यावरणपूरक उत्सव साजरे करून चांगला आदर्श निर्माण करु शकतो.या बजरंग गणेश मंडळांनी उत्सव काळात दिलेल्या सुचनेचे योग्य पालन केले आहे.त्याबद्दल बजरंग गणेश मंडळ व पदाधिकाऱ्यांचा दि. 20 सप्टेबर 2025 रोजी,पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते व अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, डि.एस. हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोकर यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.व मंडळाचे विशेष कौतुक केले.पुढील सण उत्सव काळात देखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करून ग्रामीण भागातील सण उत्सव शांतता एकोप्याने साजरे करावेत असे आवाहन केले.
