भाजपच्या कार्यकर्त्यांजवळ माहितीचा खजाना पाहिजे,आष्टी जिल्हा परिषद वर झेंडा फडकणारच,भागवत देवसरकर यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक. -- भाजपा प्रवक्ता प्रवीण साले

हिमायतनगर प्रतिनिधी /दिनांक 21 मंगळवार 
भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याजवळ भारतीय जनता पार्टीने लोकहितासाठी राबवलेल्या योजनेचा माहितीचा खजाना आवश्यकआहे, सर्वांना सोबत घेऊनच पक्ष वाढते भागवत देवसरकर यांच्या माध्यमातुन आष्टी जिल्हा परिषद गटामध्ये झेंडा फडकवणारच व या भागात संघटन बांधणी मजबूत केल्याबद्दल भागवत देवसरकर यांची कौतुकच असल्याचं भारतीय जनता पार्टी मत सदस्यता महाअभियान हदगाव विधानसभा संयोजक तथा प्रवक्ता प्रवीण साले यांनी भगवती फार्म दगडवाडी येथे सदस्य नोंदणी कार्यशाळेमध्ये व्यक्त केले,यावेळी व्यासपीठावर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भागवत देवसरकर,माजी तालुका अध्यक्ष निळू पाटीलशंकर जगदाळे. माजी सरपंच ओम ईदेवार, सर्कल प्रमुख मोरेश्वर माने, देवानंद वानखेडे, दशरथ हामंद स्वप्निल पाटील यांच्यासह बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रवीण साले म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जनकल्याण योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी कार्यकर्त्यावर असते ती जबाबदारी तन-मन-धनाने पार पाडली पाहिजे ती जबाबदारी पार पाडत असताना आपल्या चेहऱ्यांची लोकांसमोर ओळख निर्माण होते. सर्वसामान्य जनतेला सरकारच्या योजना आवडत असतात परंतु योजना सांगण्यासाठी कार्यकर्त्यांना पुरेपूर माहिती नसते अगोदर कार्यकर्त्यांनी पूर्ण माहिती घेऊन अभ्यास करून योजनेची माहिती जनतेला सांगावी त्याचबरोबर काँग्रेस पराभूत चे कारणे त्यांच्या पक्षातील दोष हे सुद्धा कार्यकर्त्यांना माहीत असावे व समोरून येणाऱ्या प्रश्नाला ताबडतोब उत्तर द्यावे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने बहुमत मिळवले २३२ सिटा आल्या त्यामुळे काँग्रेस पक्ष ईएम मशीनवर खापर फोडत आहेत तर ई एम मशीन देशात आणली कोणी याचा वापर सुरुवातीला केला कोणी आणि आता काँग्रेस विधानसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर ई एम मशीन च्या विरोधात का गेली या सर्व गोष्टीची माहिती राहणे कार्यकर्त्यांना आवश्यक असते या सर्व बाबी सांगत असताना मतदाराशी आपली ओळख निर्माण होते व आपल्या नावावर मत मिळल्या जाते या कामाची दखल निश्चितच नेत्यांना घ्यावी लागते तुमच्याकडे सदस्य नोंदणीसाठी आणखीन दहा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून आष्टी जिल्हा परिषद सर्कल चे नाव जिल्ह्याच्या नंबर एक वर नेऊन ठेवावे तेव्हा भागवत देवसरकर जिल्हा परिषद सदस्य काय तर येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांचा विचार केला जाईल मी तर म्हणतो आष्टी जिल्हा परिषद सर्कलचे भाग्य आहे असा नेता सर्कलला मिळाला ज्याचे संबंध जलसंपदमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत असून कोट्यावधी रुपयाचे कामे सत्ता नसताना केली आहे मी त्यांचे कौतुक करतो भागवत देवसरकर यांनी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी केल्याबद्दल व तसेच उपस्थित बुथ प्रमुखांनी शक्ती केंद्र प्रमुखांनी तोंडपाठ आष्टी जिल्हा परिषद गटाचा आराखडा सगितल्यानी भारावून गेलो हा तर आष्टी जिल्हा परिषद गटाचा आत्ताच विजय आहे असे ते म्हणाले.यावेळी सर्व बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर जगदाळे यांनी केले तर आभार मोरेश्वर माने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.