हिमायतनगर प्रतिनिधी/ गावचा विकास साधण्यासाठी गावातील नागरीकांच्या सहमत घेऊन गावपातळीवर ग्रामपंचायत च्या माध्यमातून विकास साधला पाहिजे गावातील स्वच्छता ,रस्ते ,शाळा, अंगणवाडी याकडे लक्ष देऊन गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी जाधव यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शासकीय कार्यालयातील कामकाजाला सुरुवात झाली असुन पंचायत समिती कार्यालयातील सर्वच अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहेत.गटविकास अधिकारी पि.एम.जाधव यांची कर्मचाऱ्यांवर सिस्त असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पं.स.चा कारोबार सुरळीत सुरू असुन सर्वसामान्य नागरीक शेतकऱ्यांच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.गुरूवारी हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, खैरगाव ,खैरगाव तांडा यासह अनेक गावांना गटविकास अधिकारी पि.एम. जाधव विस्तार अधिकारी एस.आर.शिंदे यांनी भेटी देऊन जिल्हा परिषद शाळा , क्रीडांगण बनवणे ,ओपन जिम बसविणे, हॉलीबॉल ग्राउंड पेव्हर ब्लॉक ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते इत्यादी विविध कामांची पाहणी करण्यात आली व अपूर्ण कामांचा आढावा घेऊन झालेल्या च्या कामाची पाहणी केली व सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांच्या कामाचे कौतुक केले यावेळी ग्रामसेवक आर.आर.सटलावार , सरपंच प्रतिनिधी बालाजी पावडे,आडे,उपसरपंच संतोष आंबेकर, मुख्याध्यापक गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
