हिमायतनगर प्रतिनिधी/ दिपावली च्या पार्श्वभूमीवर हदगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शनिवारी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन शहरातील व्यापारी बांधवांना भेटी घेऊन दिपावली च्या शुभेच्छा दिल्या असून व्यापाऱ्यांकडून ठिकठिकाणी जवळगावकरांचा सत्कार केला आहे.
यावर्षी दिपावली आणि विधानसभा निवडणुक एकत्र आली असल्यामुळे अनेक नेत्यांकडून कार्यकर्त्यांना दिपावली च्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शनिवारी महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर शहरातील व्यापारी बांधवांना दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक दुकानदारांच्या भेटीगाठी घेऊन दिपावलीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.शहरातील भेटी दरम्यान व्यापारी बांधवांकडून जवळगावकरांना मिठाई भरून भव्य सत्कार केला.या सत्कार प्रसंगी बोलताना आ.जवळगावकर बोलतांना म्हणाले की शहरातील व्यापारी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर प्रचंड प्रेम केले त्यांच्या आशिर्वादाने आजपर्यंतची लढाई जिंकू शकलो शहराच्या विकासासाठी होईल तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करून विकासात्मक कामे पूर्ण केली.येणाऱ्या काळात देखील शहर सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील आहे.शहरातील प्रत्येक नागरीकांनी आजपर्यंत माझ्यावर प्रेम दाखवले ते कायम राहील अपेक्षा असल्याचे जवळगावकर म्हणाले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रकाश वानखेडे,शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,अ.आखील , राष्ट्रवादी युवक चे सरदार खान,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, शहराध्यक्ष संजय माने नासभापती जनार्दन ताडेवाड, संचालक शेख रफीकभाई, माजी सभापती परमेश्वर गोपतवाड, बाळासाहेब चवरे,दिगाबंर काळे,प्रकाश रामदिनवार,अश्रफ खान, सुभाष शिंदे,योगेश चिलकावार,दिपक कात्रे, गजानन वानखेडे, मायंबा होळकर,दत्तात्रय तिमापुरे, नितेश जैस्वाल,गोविंद बंडेवार,अमोल पाटील, प्रविण अण्णा, संदीप तुप्तेवार,अ.बाकी भाई, पंडीत ढोणे,या़च्यासह शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, कांग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
