हिमायतनगर प्रतिनिधी/ शिक्षक अजिवन शिक्षक असतो तो कधीही माजी होत नाही शासकीय नियमाने सेवानिवृत्त होत असतो.आपल्या शाळेती विद्यार्थी हेच जिवनाची शिदोरी समजून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सेवा केली तर सेवानिवृत्तीचा गौरव हा आनंददायी होत असतो म्हणून सेवानिवृत्त होतांना आपण केलेल्या कार्याचा गौरव मिळतो असे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात बोलतांना केले आहे.
कवाना येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाचे सहशिक्षक बालाजी सादुलवार हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गुरूवारी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला आहे.या सत्कार प्रसंगी आ.जवळगावकर म्हणाले की आज शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे.सोशल मिडीया आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले आहे.शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करतांना विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना अभ्यासा बरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपली संपूर्ण सेवा हि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी करावी, आपल्या हातून घडलेले विद्यार्थी हेच शिक्षकांच्या सेवानिवृत्ती नंतर आपले नावलौकिक करतील तिच कमावलेली संपत्ती आपल्या सेवानिवृत्तीचा खरा गौरव असेल असे जवळगावकर म्हणाले. शिक्षक बालाजी सादुलवार यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले असल्याने त्यांचा आनंददायी सेवानिवृत्तीचा गौरव होत असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले यावेळी सुभाष राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष अ.आखील,संदीप शिंदे, शेख रफिभाई,फेरोज खान,डॉ गफार, संजय पाटील,संजय माने,सोपान बोंपीलवार,अगंद सुरोशे,व आदी उपस्थित होते.
