सरपंच बांधवांनी गाव पातळीवर योजना राबवून गरजवंत नागरीकांना योजनेचा लाभ द्यावा- गटविकास अधिकारी मांजरमकर

हिमायतनगर प्रतिनिधी/ ग्रामपंचायत स्तरावर विकास कामे करीत असताना पंचायत समिती विभागाकडून मिळणाऱ्या योजना गावात राबवून गावातील प्रत्येक नागरीकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंचानी प्रयत्नशील राहावे पंचायत समिती कार्यालयात कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही पं. सं आपल्या सोबत आहे असे गटविकास अधिकारी सुधिश मांजरमकर यांनी बैठकी दरम्यान बोलताना व्यक्त केले आहे.

        हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयात शनिवारी Gem रजिस्ट्रेशन आणि pm विश्वकर्मा रजिस्ट्रेशन कॅम्प तसेच मोदी आवास योजना लाभार्थी यादी संकलित करणे कॅम्प घेण्यात आला आहे.
 या कॅम्पला उपस्थित 
सरपंच ग्रामसेवकांना गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या योजना बाबतीत गटविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना गटविकास अधिकारी मांजरमकर म्हणाले गावातील नागरीकांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून सरपंच बांधवांनी योजना संदर्भात जनजागृती करून पंचायत समिती स्तरावरील रोजगार हमी योजनेसह इतर योजना गाव पातळीवर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे कुठल्याही प्रकारची अडचण भासु देणार नाही असे गटविकास अधिकारी मांजरमकर यांनी सांगितलेे. 

यावेळी विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे,बांधकाम विभागाचे विशाल पवार, सरपंच परमेश्वर गोपतवाड, बाळा पाटील,गणेश शिंदे, गजानन पाटील कदम,मारोती वाडेकर,सोपान बोंपीलवार, बाळू पाटील सुर्यवंशी, दयाळगिर गिरी, विनायक पाटील,ग्रामसेवक नारायण काळे, वडजकर,भोगे, कदम,पोपुलवाड,पं. स. चे म्हेत्रे, टमके,यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.